सत्यपाल मलिक यांनी पुलवामाच्या संदर्भात जी भूमिका मांडली ती अंगावर काटा आणणारी – नाना पटोले

 

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याप्रकरणी केंद्रातील मोदी सरकारवर मोठा आरोप केला आहे. मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळे पुलवामा हल्ला झाल्याचा गंभीर आरोप सत्यपाल मलिक यांनी केला आहे. पंतप्रधानांना सांगितले की पुलवामा हल्ला आपल्या चुकीमुळे घडला आहे.ण तेव्हा त्यांनी मला गप्प केले, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी भूमिका मांडली आहे.

पाटोळे म्हणाले की, सत्यपाल मलिक यांनी पुलवामाच्या संदर्भात जी भूमिका मांडली ती अंगावर काटा आणणारी आहे. आज देश धोक्यात आला आहे. देशाची सुरक्षा धोक्यात असल्याचे पटोले म्हणाले. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेसने खूप कष्ट सहन केलं आहे. जनतेच्या कोर्टात भाजप नापास झाली आहे. सावरकर हा आमचा विषय नसल्याचे नाना पटोले म्हणाले.

तर संजय राऊत म्हणाले की, आताच्या सत्ताधाऱ्यांनी जवानांची पुलवामात हत्या करावी आणि नंतर त्याच राजकारण करावे अशी काही योजना होती का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच, आज त्यांनीच नेमलेले तेव्हाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी तेच स्फोटक सत्य समोर आणलं आहे. या सरकारवर देशद्रोहाचा खटला चाललाच पाहिजे. जे मंत्री जबाबदार आहे, त्यांचे कोर्टमार्शल व्हायला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: