सत्तेत असताना झोपा काढल्या अन् सत्त गेल्यावर…’, विरोधकांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याच आज राजकीय वातावरण तापणार आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आज जाहीर सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांचा आज शेतकरी संवाद दौरा आहे. तर खासदार श्रीकांत शिंदे यांची सिल्लोडमध्ये जाहीर सभा होणार आहे. आदित्य ठाकरे अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे सभा घेतील. त्यामुळे हे दोघे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशातच औरंगाबाद येथे आदित्य ठाकरे यांना डिवचणारे बॅनर्स एकनाथ शिंदे गटातर्फे लावण्यात आले आहेत. या बॅनर्सची जोरदार चर्चा रंगली आहे.सत्ता होती तेव्हा झोपा काढत होते आणि सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या भेटी-गाठी घेताहेत, अशा आशयाचे बॅनर्स सध्या औरंगाबादेत चर्चेचा विषय ठरलेत. आदित्य ठाकरेंना डिवचणारे हे बॅनर्स शिंदे गटातर्फे लावण्यात आले आहेत. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आज औरंगाबादकडे लागलंय.

सिल्लोडमध्ये पाचशे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर अकोल्यात शेतकरी संवाद यात्रेनंतर आदित्य ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे ही सभा होणार आहे. बाळापूर मतदारसंघ शिवसेनेसाठी महत्वाचा आहे. बंडादरम्यान गुवाहटीवरुन पळून आलेले आमदार नितीन देशमूख याच मतदारसंघाचे नेतृत्व करतात. त्यामुळे या सभेत आदित्य ठाकरे आक्रमक भाषण करणार असल्याची चर्चा आहे.

Team Global News Marathi: