सत्तासंघर्षावर पुन्हा तारीख पे तारीख, पुढील सुनावणी या तारखेला

 

मुंबई | शिवसेना कुणाची? या एका प्रश्नावर गेल्या 6 महिन्यांपासून राज्यातील सत्तानाट्याचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या प्रकरणावर आता 141 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर सध्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर हे प्रकरण आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीत दोन्ही पक्षांकडून कोणत्या मुद्द्यांवर युक्तिवाद होणार, हे मुद्दे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश घटनापीठाने दिले होते.

सत्तासंघर्षप्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागील सुनावणीत केली होती. त्यामुळे या मागणीवर आज निर्णय होण्याची शक्यता होती. पण आता हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे गेलं आहे.

त्यामुळे केस लांबणीवर पडली आहे. काय आहे वाद? आपण शिवसेना सोडलेली नसून आपला गटच खरी शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आपल्याच गटाला मिळावे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने एका याचिकेद्वारे निवडणूक आयोगाकडे केला आहे. मात्र, शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत कोणतीही कार्यवाही करण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने करण्यात आली होती.

Team Global News Marathi: