पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत आहे. नरेंद्र मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

पंतप्प्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. या संदर्भात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. भाजपने मिशन मुंबई महापालिका निवडणूक सुरू केलं आहे. मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला मोठे महत्त्व आहे.

महाविकास आघाडी स्थापन होऊन आता जवळपास अडीच वर्ष होत आली आहेत असं असताना भाजपनं मिशन 2024 च्या नावाखाली मोर्चेबांधणी सुरू केली. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने मोदींचा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. अनेक विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. बीकेसीच्या मैदानावर भाजप मोठा कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून तयारी सुरू आहे. अद्याप यावर अंतिम निर्णय बाकी आहे.

Team Global News Marathi: