‘सत्ता परिवर्तन करण्याची लढाई नाही तर व्यवस्था परिवर्तन करण्याची लढाई आहे’

औरंगाबाद | ‘२०१३ मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्च्यात आम्ही सत्ता परिवर्तन करणार असं सांगितलं होतं आणि तेच झालं. पण आता सत्ता परिवर्तन करण्याची लढाई नाही तर व्यवस्था परिवर्तन करण्याची लढाई आहे’ असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला.

औरंगाबाद पाणी प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. पैठण गेटवरून सुरू झालेला मोर्चा हा पालिकेसमोर मोठ्या सभेत पार पडला यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. संभाजीनगरच्या इतिहासातला अभुतपूर्व मोर्चा असेल. 2013 मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. त्यावेळी आम्ही सत्ता परिवर्तन करणार असं सांगितलं होतं आणि तेच झालं. पण आता सत्ता परिवर्तन करण्याची लढाई नाही तर व्यवस्था परिवर्तन करण्याची लढाई आहे. हा मोर्चा भाजप पक्षाचा नाही. हा मोर्चा जनतेच्या आक्रोश आहे.

 

संभाजीनगरमध्ये जुम्मे के जुम्मे पाणी येत आहे. थेंब थेंब पाण्यासाठी लोक परेशान असतील तर आम्ही शांत बसणार नाही. आम्ही संघर्ष जेव्हाच संपेल, जेव्हा संभाजीनगरमध्ये पाणी येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला शांत बसू देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. ‘माझ्या या मोर्चाला परवानगी देताना किती अटी टाकल्यात. इकडे मोर्चा काढायच्या नाही, तिकडे स्टेज उभारयचा नाही. हा जनतेचा आक्रोश आहे, त्याला तुम्ही रोखू शकत नाही. आमचे कार्यकर्ते शिवसेनेचे पोस्टर फाडत होते, तुम्ही यांचा आक्रोश फाडू शकत नाही. नळातून वाफा येत आहे.

आज तर आमची एक 80 वर्षांची आजी हंडा घेऊन मोर्च्यामध्ये होती. हंडा घेऊन होती, झुकेंगा नाही म्हणणाऱ्या 80 वर्षांच्या आजीच्या घरात गेला होता. मग मुख्यमंत्री महोदय, हंडा घेऊन चालणाऱ्या या 80 वर्षांच्या आजींच्या घरात कधी जाणार आहात, हा आक्रोश तुम्हाला कधी समजणार, असा सवालच फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला.

Team Global News Marathi: