सातव्या दिवशी ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईनं, तोडले या चित्रपटाचे रेकार्ड

 

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचा ब्रह्मास्त्र सिनेमा 9 सप्टेंबरला रिलीज झाला. पहिल्या आठवड्यात चांगली कमाई करून दिली. मात्र आता याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घट होताना दिसत आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र सिनेमाच्या बॉक्स ऑफिसमध्ये सातत्याने घसरण होत आहे.

सोमवारनंतर दिवसेंदिवस कमाईत घट होताना दिसून येत आहे. 36.42 कोटींची ओपनिंग देणाऱ्या या सिनेमाची कमाई गुरुवारी केवळ 9 कोटीच होती. रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन यांसारख्या स्टार्सनी सजलेल्या या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड तयार केले.

सिनेमाने शुक्रवारी 36.42 कोटी, शनिवारी 42.41 कोटी आणि रविवारी 45.66 कोटींचा व्यवसाय केला. सोमवार येताच सिनेमाच्या कमाईत घसरण सुरू झाली. सिनेमाने सोमवारी 16.5 कोटी रुपये, मंगळवारी 14.00 कोटी रुपये, बुधवारी 11 कोटी रुपये आणि गुरुवारी 9 कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यंत या सिनेमाचा एकूण 173.20 कोटींचा व्यवसाय झाला आहे.

Team Global News Marathi: