पुण्यात लस घेऊन सुद्धा वैद्यकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

पुण्यातील ससून रुग्णालयात कोरोनाची लस घेऊन सुद्धा एका वैद्यकीय कार्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात एकचं खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी या कर्मचाऱ्याने कोरोनाच्या पहिल्या लसीचा डोस घेतला होता.

मात्र लस घेतल्यानंतर कार्मचाऱ्याला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने कोरोना चाचणी करून घेतली. मात्र चाचणी करून घेतल्यानंतर तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.

यावर बोलताना ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता मुरलीधर तांबे यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आव्हान केले आहे. या कार्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असली तरी काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. त्यामुळे घाबरुन जाऊ नका, असे मुरलीधर तांबे यांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: