कोरोनाचा धोका वाढला, यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर

संपूर्ण राज्यभरात एकीकडे कोरोना लसीकरण सुरु झालेले असताना दुसरीकडे मात्र काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव पुन्हा एकदा झालेला दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढली आहे. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत लॉकडाऊनची अंबलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला आहे.

यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद या तीन ठिकाणी अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहे. दिवसाला प्रत्येकी १५०० नमुन्याची तपासणी केली जात आहे. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने मृत्यू होण्याची कारणे या संदर्भात डेथ ऑडीट रिपोर्ट अधिष्ठाता यांनी सादर करावा असे आदेश दिले आहे.

तसेच हाय -रिस्क, लो-रिस्कनुसार लॉकडाऊन राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. यवतमाळमध्ये सोशल डिस्टनसिंग न पाळणे, लग्न समारंभ मध्ये झालेली गर्दी, मास्क न वापरणे, आधी नियम पायदळी तुडविल्याने हा आलेख वाढल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: