सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिवसेना संतप्त

 

शिवसेनेत बंडखोरी करत शिंदे गटात गेलेल्या 16 आमदारांवर शिवसेनेने अपात्रतेची कारवाई केली होती. या निर्णयाला आव्हान देत शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांना दिलासा देत या याचिकेवर आजची तारीख दिली होती. त्यानंतर आजच्या कामकाजात हा विषय नाही म्हणून आजचा निकाल लांबणीवर पडला. आज न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांना कोणतेही निर्णय न घेण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिंदे गटतील 16 आमदारांना दिलासा मिळाला आहे. शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी या याचिकेवर सुनावणीची मागणी न्यायालयाकडे केली असता, न्यायालयाने हे निर्देश दिले. न्यायालयाच्या या आदेशावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधाला. सर्वोच्च न्यायालयाकडून हे अपेक्षीत नाही म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम सध्या सुरु आहे. कायद्याची पायमल्ली होत असताना सर्वोच्च न्यायालय आणि सर्वचजन शांत आहेत. अध्यक्षांनी निर्णय घेऊ नये, या आदेशामुळे न्यायालयाने कोणाला दिलासा दिला आहे? असे अरविंद सावंत म्हणाले. तसेच आता राजकीय विश्लेषक सुद्धा यावर प्रतिक्रिया देत आहेत.

Team Global News Marathi: