शिंदेगटाकडून मनसे नेते अमित ठाकरेंचं स्वागत? आमदार महेंद्र थोरवेंसोबत चर्चा

 

मुंबईः शिवसेनेच्या गोटातून आमदारांनंतर खासदारांचीही गळती होत असल्याच्या बातम्या येत असतानाचा शिंदे गटाची ताकदही वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या प्रत्येक आमदार आणि खासदारांच्या प्रत्येक हालचालींवर जनतेचं लक्ष आहे. या राजकीय स्थितीत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली आहे.

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख असून त्यांनी महेंद्र थोरवे यांची घेतलेली भेट ही मुंबई आणि परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. एकनाथ शिंदे यांचा गट बाहेर पडल्यानंतर पक्षांतर बंदी कायद्यानुसार, शिंदे गटाला कोणत्या तरी पक्षाल विलीन व्हावं लागेल, असं म्हटलं जात होतं. यात भाजप किंवा मनसे पक्षाचीही चर्चा होती. मात्र शिंदे गटाने आपणच शिवसेना आहोत, शिवसेना सोडून आम्ही कुठेही जाणार नाहीत, असं म्हटल्याने ही शक्यता पूर्णपणे नाकारण्यात येऊ लागली.

कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आज मनविसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली. मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियानानिमित्त अमित ठाकरे कर्ज दौऱ्यावर आहेत. यावेळी महेंद्र थोरवे यांनी त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यानंतर दोघांमध्ये तब्बल २० मिनिटं चर्चा झाली. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर या दोन नेत्यांमध्ये संवाद झाला. मात्र चर्चेत नेमके कोणते मुद्दे होते, याविषयीचा तपशसील अद्याप कळू शकलेला नाही.

 

Team Global News Marathi: