सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिन होण्याची शिंदे गटासमोर अट?

 

महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी सूचक ट्वीट केलं आहे. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची अट शिंदे गटासमोर ठेवलीय का असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा होऊ लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे? असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

यावर बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, प्रकाश आंबेडकर काय बोलतात याचा भाजपशी काही संबंध नाही. याआधीही त्यांनी अशी अनेकदा चित्रविचित्र वक्तव्य केलेली आहेत. शिवसेनेत सध्या जे काही सुरु आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्याशी भाजपचा काही संबंध नाही, असंही भातखळकर म्हणाले.

तसेच भाजपची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी, कामासाठी संघर्ष करत राहू. हे सरकार अंतर्विरोधानं भरलेलं सरकार आहे. तिन्ही पक्ष एकमेकांशी भांडतात, हे राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत स्पष्ट झालं आहे, असंही भातखळकर म्हणाले.

 

Team Global News Marathi: