दीपक केसरकर, सदा सरवणकर, आशिष जैस्वाल गुवाहाटीत दाखल, हॉटेलला छावणीचं स्वरूप

 

मुंबा | दीपक केसरकर, आशिष जैस्वाल, मंगेश कुडाळकर आणि सदा सवरणकर हे चारही आमदार गुवाहाटीमधील एकनाथ शिंदे थांबलेल्या हॉटेलमध्ये पोहचले आहेत. यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. आशिष जैस्वाल हे शिवसेना पक्षप्रमुख यांचे निकटवर्तीय समजले जातात. कालपासून आशिष जैस्वाल हे नॉट रिचेबल होते. अखेर ते गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. तर दुसरीकडे दीपक केसरकरही शिंदे गटात सामील झाले आहेत.

आशिष जेस्वाल यांना मिळून एकूण तीन आमदार गुवाहाटीत दाखल झालेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानं शिवसेनेसमोरच मोठा पेच निर्माण झाला आहे. आपल्यासोबत असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असा दावा आता एकनाथ शिंदे करण्याची शक्यता आहे. चार आमदार वाढल्यानं आता एकनाथ शिंदे यांना मिळणारा शिवसेना आमदारांचा पाठिंबाही वाढलाय.

समोर आलेल्या माहितीनुसार आशिष जैस्वाल यांच्यासह मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर आणि दीपक केसरकर या सर्व आमदारांसह गुवाहाटी इथं पोहोचलेले आहेत. सकाळी साडे नऊ वाजता ते गुवाहाटी विमानतळावर दाखल झाले. हे सर्व आमदार गेल्या २४ तासांपासून नॉट रिचेबल होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशिष जैस्वाल गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. काँग्रेसने नेते टक्केमारी मागत असल्याचा कारणाचा आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र या आरोपांवर कोणतीही कारवाई न झाल्यानं ते नाराज असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर आता आशिष जैस्वाल हे गुवाहाटीत दाखल झालेत.

Team Global News Marathi: