संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीनंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

 

खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. गुरुवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली.या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संताप व्यक्त करत, त्यांना महाराष्ट्रातून हटवण्याची मागणी केली होती. राज्यपालांना न हटवल्यास त्यांनी राज्य सरकारला महाराष्ट्र बंदचा इशारा देखील दिला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर आज दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.संजय राऊत यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. तसेच उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमधून त्यांनी राज्य सरकारवर घणाघात केला. तसेच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा देखील समाचार घेतला. राज्यपालांचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ चालू आहे. केंद्रात ज्यांचे सरकार असते त्यांचीच माणसांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात येते.

केंद्राचं हे पार्सल वृद्धाश्रमात पाठवा असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेनंतर आज संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

Team Global News Marathi: