संजय राऊतांची वाईन कंपनीसोबत भागीदारी, किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

 

मुंबई | राज्यातील सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्रीसाठी महविकास आघाडीचे राज्य मंत्रिमंडळात परवानगी दिली आहे. ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांकडून या निर्णयाविरोधात टीका करण्यात येत आहे.

आता त्यापाठोपाठ भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राऊतांची वाईन कंपनीसोबत पार्टनरशिप किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, वाईन संदर्भात संजय राऊत यांचे विशेष प्रेम का? जेव्हा गांजाचा विषय निघाला तेव्हा शरद पवार, नवाब मलिक म्हणत होते की गांजा म्हणजे हर्बल वनस्पती आहे.

संजय राऊत यांनी काही महिन्यापूर्वी एका वाईन कंपनी सोबत बिझनेस पार्टनशिप केली. संजय राऊत यांनी सांगावे की, त्यांच्या कन्या यांची कोणत्या वाईन कंपनीशी भागीदारी आहे. मॅकपी ग्रुप्सची मोनोपोली आहे अशोक गर्ग हे त्याचे मालक आहे. अशोक गर्ग महाराष्ट्रातील पब, क्लब यांना वाईन सप्लाय करतात. १६ एप्रिल २०२१ ला यापूर्वी कधीही मॅकपीची कुणाशीही पार्टनशिप नव्हती. पण त्यानंतर संजय राऊत यांच्या दोन मुलींनी या कंपनीमध्ये पार्टनशिप केली. या कंपनीचे पुर्वीचे नाव मादक पार्वेटलिमिटेट असे नाव होते असंही किरीट सोमय्या म्हणाले.

Team Global News Marathi: