देशात नवीन राष्ट्रपिता तयार होतोय, त्याचं नाव नथुराम गोडसे

नवी दिल्ली | देशात राष्ट्रपती महात्मा गांधी आणि त्यांची हत्या करणारा नथुराम गोडसे यांच्यावरून वाद सुरु असलेले दिसून येत आहे. अशातच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी असलेला नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाबाबत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी खंत व्यक्त केली आहे.

उशीर गांधी म्हणाले की, थोडीच वर्षे शिल्लक राहिली आहेत, आता हा देश गांधींचा राहणार नाही. महात्मा गांधींची शिकवण संपुष्टात येत आहे आणि मारेकरी नथुराम गोडसेची विचारधारा प्रबळ होत आहे. देशात आता नवीन राष्ट्रपिता तयार होत असून त्याचे नाव नथुराम गोडसे असेल, असंही गांधी म्हणाले आहेत.

30 जानेवारी, महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त जालन्यातल्या जेईएस महाविद्यालयात ‘करके देखो’ हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. या व्याखानादरम्यान तुषार गांधी यांनी ही खंत व्यक्त केली आहे. केला आहे.

यावेळी बोलताना तुषार गांधी म्हणाले की, देशातील सध्या स्थितीमध्ये प्रचंड विषमता असून गांधी विचारांचा द्वेष करणाऱ्या मानसिकतेकडून द्वेषाचा खुलेआम प्रसार होत आहे. त्यामुळे गांधी विचारांचा द्वेष करणारे हळू हळू आपल्या पायाखालची जमीन ओढून घेत असल्याचं तुषार गांधी यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: