राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांना संजय राऊतांचा इशारा…..!

राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांना संजय राऊतांचा इशारा…..!

सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी विनाकारण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव गुंतवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षातील नेते मंडळी करताना दिसत आहे. त्यातच आता खुद्द मंत्री आदित्य ठाकरे यांनी या नीच राजकारणावर टीका सुद्धा केली आहे. यावर आता खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल असा जाहीर इशारा संजय राऊतांनी दिला आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्याने काही लोकांच्या पोटात दुखत असून अस्वस्थ आहेत. वैफल्यातून अशा प्रकारचे घाणेरडे आरोप केले जात आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांचा या सगळ्याशी काय संबंध. राज्यात ठाकरे सरकार आल्याने विरोधी पक्षातील काही जणांच्या पोटात दुखत आहे. ज्यांना हे सरकार अजूनपर्यंत रुचलेलं नाही ते वैफल्यातून अशा प्रकारचे घाणेरडे आरोप करत आहेत. मला तर हे संपूर्ण महाराष्ट्राविरोधात कारस्थान असल्याची शंका आहे. यामागील सूत्रधार आम्हाला माहिती आहेत. मात्र त्या सगळ्यांना या कारस्थानाची मोठी किंमत मोजावी लागेल असे मी जाहीरपणे सांगतो असा संजय राजुच्या यांनी म्हंटल आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: