संजय राऊतांची सुरक्षा वाढवली पण अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचं काय ? – निलेश राणे

 

मुंबई | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्र्यांवर केलेल्या विधानानंतर राणे यांना अटक त्यानंतर सुटका करण्यात आली होत. या प्रकरणामुळे राणे आणि शिवसेनेमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या एका विधानावरून त्यांना अटक करण्यात आली.

राणेंवर सामनातून करण्यात आलेल्या टिकेनंतर नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी संजय राऊत सापडतील तिथे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिला. निलेश राणेंच्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांची सुरक्षा वाढविण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा भप नेते आणि माजी खासदार निलेश राणेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

निलेश राणें आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, अनधिकृत फेरीवाले हटवायला गेलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण, त्यांची बोटं छाटली जातात पण अधिकाऱ्यांच्या संरक्षणाचं ठाकरे सरकारला घेणंदेणं नाही. पण संज्या जो मार खायच्या लायकीचा आहे त्याचं संरक्षण वाढवलं. शिवसेनेच्या खास लोकांनाच सत्तेचा फायदा, सामान्य शिवसैनिक फटके खातो, असे ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.

 

 

Team Global News Marathi: