संजय राऊतांच्या टीकेला प्रवीण दरेकरांनी दिले सडेतोड उत्तर |

 

मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी हप्ता वसुलीचा आरोप लावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यात आज सकाळी पुन्हा एकदा ईडीने त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानी छापा टाकला. त्यानंतर राजकीय वातारण तापलं असून देशमुखांच्या अटकेच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचे वक्तव्य केले. त्यावर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविन दरेकर यांनी टीका केली आहे.

ईडीकडून देशमुखांवर होत असलेली कारवाई कोणाच्याही आशीवार्दाने किंवा सूडभावनेतून केली जात नाही. ईडी स्वायत्त तपास यंत्रणा आहे. त्यामुळे तपास यंत्रणेचा भाग म्हणून ही कारवाई होत आहे”, असे दरेकरांनी उत्तर दिले. खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईतून राज्यात भाजपचं सरकार येईल, असं वक्तव्य करत भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा दरेकर यांनी समाचार घेतला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ईडीकडून देशमुखांवर होत असलेली कारवाई कोणाच्याही आशीवार्दाने किंवा सूडभावनेतून केली जात नाही. ईडी स्वायत्त तपास यंत्रणा आहे. त्यामुळे तपास यंत्रणेचा भाग म्हणून ही कारवाई होत आहे”, असे दरेकरांनी उत्तर दिले. खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईतून राज्यात भाजपचं सरकार येईल, असं वक्तव्य करत भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा दरेकर यांनी समाचार घेतला.

Team Global News Marathi: