संजय राऊतजी, आधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे ते सांगा – चित्रा वाघ

 

मुंबई | नरेंद्र मोदीं यांच्या कॅबिनेट विस्तारावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला होता. धर्मेंद्र प्रधान हे देशाला नवे शिक्षणमंत्री मिळाले. आधी ते पेट्रोलियम मंत्री होते, मी त्यांना ओळखतो. कालपर्यंत ते रॉकेल, पेट्रोल विकत होते. याआधी रमेश पोखरियाल होते. ते शाळेतच गेले नव्हते पण ते देशाचे शिक्षणमंत्री होते. त्याच्याआधी स्मृती इराणी होत्या त्या मॉडेलिंग करायच्या. म्हणजेच शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोक शिक्षण घडवतात अशा शब्दात संजय राऊत यांनी नव्या मंत्री मंडळाच्या विस्तारावर टीका केली आहे.

भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, तुमच्या बंधूंनाही मंत्रिपद मिळेल ही अपेक्षा आहे. मग तुम्हालाही काँग्रेस राष्ट्रवादीचे आभार मानायची संधी मिळेल. तुम्ही केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्याबद्दल जे काही बरळलात, त्याआधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामना संपादकपदाचा काय संबंध आहे ते सांगा. मग मी स्मृती ईराणी आणि त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा काय संबंध याचा खुलासा करेन.

तुमच्या भाषणात, बाईटमध्ये बोलताना महिलांचा सन्मान होईल अशी विधाने करा नाहीतर आम्हाला सुद्धा आरे ला कारे करायची भाषा चांगल्या पद्धतीने येते हे तुम्ही ध्यानात ठेवा असा इशारा त्यांनी दिला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटरवर विडिओ शेअर करून संजय राऊतांच्या टीकेवर जोरदार निशाणा साधला आहे. आता या टीकेला शिवसेना काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

 

Team Global News Marathi: