लसीकरण, कोरोनाशी लढ्याला प्राधान्य देणार – भारती पवार

 

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या मंत्री मंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातून चार जणांना संधी देण्यात आली असून मागच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेल्या भारती पवार यांना सुद्धा मोदींच्या मंत्री मंडळात स्थान मिळाले असून त्यांच्यावर केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्रिपदाची सूत्रे सोपवली आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी आपला काल पदभार स्वीकारला आहे. तसेच पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

त्या म्हणाल्या की, देशापुढे असलेले कोरोनाचे संकट पाहता, आगामी काळात कोरोनाशी लढा व देशातील प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. दिल्लीतील शपथविधी सोहळ्यासाठी ऐनवेळी बोलावणे आल्याने एकट्याच गेलेल्या डॉ. भारती पवार यांच्या भेटीसाठी गुरुवारी कुटुंबातील सदस्य दिल्लीला रवाना झाले आहेत.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांची थेट केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी व त्यातल्या त्यात त्यांच्या आवडीच्या असलेल्या आरोग्य क्षेत्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने त्यांना समाधान आहे. यानिमित्ताने का होईना, वैद्यकीय सेवेला हातभार लागण्याची संधी आरोग्य राज्यमंत्रिपदामुळे मिळाल्याचे डाॅ. पवार यांनी सांगितले. देशात लसीकरणाने वेग धरला असून, डिसेंबरअखेरपर्यंत प्रत्येक नागरिकाचे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यादृष्टीने पावले उचलली जातील, असेही त्या म्हणाल्या.

Team Global News Marathi: