“संजय राऊतांनी तीन कोटी देऊन अलिबागमध्ये १० प्लॉट विकत घेतले” ईडीचा खुलासा

 

काही दिवसांपूर्वी पत्राचाळ प्रकरणात ईडने शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक केली होती मात्र आता चौकशीनंतर संजय राऊत यांच्या अडचणी भर पडणार असल्याचे दिसत आहे. ईडीने केलेल्या छापेमारीमध्ये काही महत्वाची कागदपत्रं हाती लागली असून ही कागदपत्रं राऊत यांच्या अलिबागमधील संपत्तीसंदर्भातील असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तसेच संजय राऊत यांच्यामुळेच प्रवीण राऊत हे म्हाडाच्या पत्रा चाळ पुनर्विकासाची परवानगी मिळवू शकले. या बदल्यात संजय राऊत यांना मोठी रोख रक्कम मिळाल्याच्या दिशेने आता ईडीच्या तपासाची दिशा निश्चित केली आहे. त्यामुळे आज न्यायालयामध्ये राऊत यांची कोठडी आणखी वाढवून मिळण्याची मागणी ईडीकडून केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊतांशी संबंधित मुंबईतील दोन ठिकाणांवर मंगळवारी केलेल्या छापेमारीमध्ये महत्वाची कागदपत्रं हाती लागल्याचा दावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या तपासामध्ये संजय राऊत यांनी तीन कोटी रुपये रोख रक्कम देऊन अलिबागमध्ये १० प्लॉट विकत घेतले.

या संदर्भात एचडीआयएलच्या अकाऊटंटचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. एचडीआयएलच्या माध्यमातूनच हे व्यवहार झाल्याचे सांगितले जात आहे. राऊत यांच्या खात्यावर पैसे वळवण्याबरोबरच त्यांना प्रवीण राऊत यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले होते. हाच पैसा संजय राऊत यांनी अलिबाग आणि मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केला आहे.

Team Global News Marathi: