संजय राऊतांकडून सोमय्यांच्या मेट्रो डेअरी गैरव्यवहाराची कागदपत्र सादर

 

भाजप नेते किरीट सोमय्या हेच सर्वात मोठे भ्रष्टाचारी आहेत. सोमय्या महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त कसा करणार? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे. किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करताना त्यांच्या युवक प्रतिष्ठानला ईडी आणि सीबीआयकडून कसे पैसे मिळतात, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर आरोप करणार एक ट्वीटही केलं आहे.

टॉयलेट घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊतांविरोधात तक्रार करण्यासाठी संपूर्ण सोमय्या कुटुंबानं पोलीस ठाणं गाठलं होतं. तर आज राऊतांनी सोमय्यांशी संबंधित युवक प्रतिष्ठानवर आरोपांचा नवा बॉम्ब फोडला आहे. पश्चिम बंगालच्या मेट्रो डेअरीकडून युवक प्रतिष्ठानला लाखो रुपयांचं डोनेशन मिळाल्याचा आरोप संजय राऊतांनी ट्वीट करत केला आहे. तसंच मेट्रो डेअरीची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु असल्याचा दावाही संजय राऊतांनी केला आहे. याचसंदर्भात आज माध्यमांशी त्यांनी सविस्तर बातचित केली.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “पश्चिम बंगालमध्ये मेट्रो डेअरी म्हणून आहे. त्या मेट्रो डेअरीच्या डिइन्व्हेस्टमेंट प्रक्रियेत गैरव्यवहार झालेले आहेत. त्यासंदर्भात ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडल्या आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपये देण्यात असून खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. अशा कंपन्या किरीट सोमय्या यांच्या प्रतिष्ठानला देणग्या कशा देतात? अशा एकूण 172 कंपन्या आहेत.” तसेच, संजय राऊतांनी मेट्रो डेअरीच्या गैरव्यवहारांची कागदपत्र माध्यमांसमोर सादर केली.

त्यावेळी बोलताना, काल हे महाशय अर्थात (किरीट सोमय्या) तक्रार करायला गेले होते. आमची प्रतिष्ठा गेली याप्रकरणी. ही त्यांची प्रतिष्ठा मेट्रो अजून मी काहीही काढलेलं नाही. हे हिमनगाचं एक टोक आहे. याहीपेक्षा मोठी प्रकरणं बाहेर येतील. भ्रष्टाचार विरोधी असल्याचा मुखवटा घालून हा माणूस गेली अनेक वर्ष उद्योगपती, कंपन्या, व्यापारी बिल्डर्स यांच्याकडून खंडण्या गोळा करतोय, असंही राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: