संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या! १ जुलै रोजी हजर राहण्यासाठी ईडीने बजावले दुसरे समन्स

 

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्षही आणखी तीव्र होताना दिसत आहेत.

अशातच शिवसेना नेते अन राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, संजय राऊत यांनी ईडीसमोर चौकशीला हजेरी लावली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा संजय राऊत यांना ईडीने दुसरं समन्स बजावत १ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. एकीकडे राज्यात सत्तासंघर्ष पराकोटीला पोहोचला असताना दुसरीकडे राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं.

पत्राचाळ जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आलं. संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, संजय राऊत यांनी अलिबाग मेळावा आणि अन्य काही कारणास्तव चौकशीला हजर राहणार नसल्याचं सांगितलं होतं. तसंच उत्तर दाखल करण्यासाठी मुदत मिळावी, अशी विनंती केली होती. संजय राऊत यांच्यावतीने त्यांचे वकील ईडी कार्यालयात हजर झाले.

Team Global News Marathi: