संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईने आनंद, शिंदे गटाची प्रतिक्रिया

 

मुंबई | शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे तर दुसरीकडे या कारवाईवर शिंदे गटाने प्रतिक्रिया दिली आहे.

ईडीचा एवढा मोठा छापा पडतो त्यावेळी अटक होण्याची शक्यता अधिक असते. संजय राऊत यांच्या भोंग्यामुळे शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे सामान्य शिवसैनिकासह 40 आमदार आणि 12 खासदारही आनंदी असतील अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. राऊत यांच्याकडे प्रखर वाणी आणि लेखणीवर प्रभुत्व आहे, त्याआधारे त्यांनी स्वत: ची सुटका करून घ्यावी असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आमचं पोस्टमार्टेम करायला निघालेल्या संजय राऊत यांचं पोस्टमार्टेम तपास यंत्रणांनी सुरू केले असल्याचे शिरसाट यांनी म्हटले.

आज सकाळी, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडी पथकाने छापा मारला. ईडीकडून संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले की, राऊत यांच्या भोंग्यामुळेच शिवसेनेत फूट पडली. राऊत हे प्रवक्ता होते, मास लीडर नाही. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईने मोठा क्षोभ उसळून येणार नाही असेही शिरसाट यांनी म्हटले.

राष्ट्रवादी व काँग्रेससोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रिपद मिळवले. मग विश्वासघात कोणी केला?

… तर सेनेची पळता भुई थाेडी हाेईल!; आशिष शेलारांची घणाघाती टीका

Team Global News Marathi: