पापाचा घडा भरला की तो फुटतोच, राऊत यांना अटक होणारच- नवनीत राणा

 

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे तर दुसरीकडे या कारवाईवर खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘पापाचा घडा भरला की तो फुटतोच, राऊत यांना अटक होणारच’ अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे. यापूर्वी सुद्धा नवनीत राणा यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला होता.पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. 10 ईडीचे अधिकारी राऊतांच्या मैत्री बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. या सुरक्षा रक्षकांनी राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला असून कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती.

मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. त्यानंतर आज अचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

राष्ट्रवादी व काँग्रेससोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रिपद मिळवले. मग विश्वासघात कोणी केला?

… तर सेनेची पळता भुई थाेडी हाेईल!; आशिष शेलारांची घणाघाती टीका

Team Global News Marathi: