संजय राऊत यांची ‘सूरत’ बघण्यासारखी झालीय, या महिला नेत्याने लगावला टोला

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेते वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. रोज सकाळी शिवसेनेची भूमिका माध्यमांसमोर मांडणारे शिवसेना नेते संजय राऊत मंगळवारीही माध्यमांसमोर आले होते. त्यावेळी, त्यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि भाजप नेत्यांवर जबरी टिका केली. तसेच, सूरतमधील आमदार हे शिवसैनिक असून एकनाथ शिंदे आमचे जिवाभावाचे आहेत, असेही ते म्हणाले. मात्र राऊतांचा चेहरा सर्वकाही सांगता होता, त्यावरुनच भाजप आमदाराने राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.

शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड पुकारल्यानंतर काल संपूर्ण दिवसभर मौन बाळगणारे एकनाथ शिंदे यांनी आज पहाटेपासून प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे आपल्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर भाजपाला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करण्याबाबत शिंदे यांनी थेट उत्तर देणं टाळलं आहे.

मात्र तत्पू्र्वी शिवसेनेकडून संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत रणनिती आणि पुढील दिशा सांगितली. तसेच, सूरतमध्ये असलेले हे सर्व आमदार परत येतील, आमदारांना जबरदस्तीने ठेवलं आहे, असेही ते म्हणाले. राऊत यांनी माध्यमांनी संवाद साधला, त्यावेळी त्यांचा चेहरा काहीही पडलेला दिसला. यावरुनच भाजप आमदाराने राऊत यांना टोला लगावला आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू-जिंतूर मतदारसंघातील महिला आमदार मेघना बोर्डीकर यांनी ट्विट करुन राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांची ‘सुरत’ बघण्यासारखी झाली आहे, असे ट्विट त्यांनी केलं आहे.

 

Team Global News Marathi: