संजय राऊत हे दुर्बीण घेऊन बसले आहेत, कुठं छिद्र आहे हे बरोबर शोधतात – चंद्रकांत पाटील

 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे, पाटील हे आज कोल्हापूरमध्ये होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारला चांगल झापलं होत तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यांवरही जोरदार निशाणा साधला आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर, पोटनिवडणुकांचा निकाल तसेच राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरूनही चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यात मुख्यमंत्री बदलले का असा सवाल विचारत चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे. ते आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत यांनी काय म्हणायचं हा त्यांचा प्रश्न आहे पण पोटनिवडणुकीत एकुण जास्त जागा भाजपनं जिंकल्या असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. तर संजय राऊत हे दुर्बीण घेऊन बसलेत. संपुर्ण पोशाख ते बघत नाहीत, कुठं छिद्र आहे हेच ते बरोबर शोधुन काढतात, असा खोचक टोलाही चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना लगावला आहे.

Team Global News Marathi: