‘मी मुख्यमंत्री झालो नाही एवढंच बोंबलायचं, स्वत:च्या पुढे-मागे दोन गाड्या फिरवायच्या’, गुलाबराव पाटलांचा खडसेंना जोरदार टोला

जळगाव: महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलेले दिसुन येत असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडताना दिसून येत आहे. महानगर पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघायला सुरुवात झाल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यात तर तीन दिग्गज नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आहे.

शिवसेना नेते, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. कधी एकनाथ खडसे गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांवर टीका करत आहेत, कधी महाजन खडसेंवर, तर कधी गुलाबराव खडसे आणि महजनांवर टीका करत आहेत. विशेष म्हणजे गुलाबराव यांनी आज एकनाथ खडसे यांच्यावर प्रचंड आक्रमकपणे टीका केली. “मी मुख्यमंत्री झालो नाही एवढंच बोंबलायचं, स्वत:च्या पुढे-मागे दोन गाड्या फिरवायच्या”, अशा शब्दात गुलाबरावांनी खडसेंना टोला लगावला.

नेमकं काय आहे प्रकरण

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात माझ्या जिल्ह्यात एकनाथ खडसे सारखा डाकू असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. गुलाबराव पाटील यांच्यासारखा उच्च शिक्षित, निर्व्यसनी आणि कार्यतत्पर अशा स्वरुपाचे मंत्रीमहोदय एकनाथ खडसे आमच्या जिल्ह्यात डाकू आहेत, असं म्हणतात. मला वाटतं अशा निर्व्यसनी माणसाविरुद्ध न बोललेलं बरं. चोरो को सारे नजर आते है चोर, या पेक्षा अधिक प्रतिक्रिया माझ्याकडे नाही”, अशा शब्दांत खडसेंनी टीका केली होती.

Team Global News Marathi: