मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपला सडेतोड उत्तर देणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासह इतर दहा नेत्यांची यादीही शिवसेनेनं जाहीर केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये प्रवक्तेपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे.
हे आहेत प्रवक्ते
१) संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते
२) अरविंद सावंत – खासदार (मुंबई)
३) प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार
४) डॉ. निलम गोऱ्हे – विधानपरिषद आमदार
५) सुनील प्रभू – आमदार (मुंबई)
६) प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)
७) किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)
८) धैर्यशील माने – खासदार (कोल्हापूर)
९) गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री
१०) अॅड. अनिल परब – परिवहन मंत्री
११) उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री