विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोर्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये नीलमताई स्वतः धावून जातात. महिलांचे प्रश्न सोडविण्यास त्यांचे कायम प्राधान्य असते. निलमताईंची उपसभापतीपदी दुसर्यांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो असे मुख्यमंत्री शुभेच्छापर भाषण करतांना म्हणाले.
कंगनाने मुंबई पोलिसांची माफी मागावी, अन्यथा ५० कोटींचा दावा ठोकू
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदस्य सर्वश्री जयंत पाटील, शरद रणपिसे, कपिल पाटील यांनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संजय राऊत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते; ‘हे ’ १० नेतेही असणार दिमतीला