“संजय राऊत सारखी माणसे पैसे टाकले की मिळतात”

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते. त्यातच शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे. आता नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. संजय राऊत सारखी माणसे बाजारात पैशाचा तुकडा टाकली की मिळतात.त्यांना महत्व देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

नितेश राणे म्हणाले, संजय राऊत सारखी माणसे बाजारात पैशाचा तुकडा टाकली की मिळतात. त्यांना महत्व देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. संजय राऊत नेमके राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आहेत की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे त्यांना माहीत नाही अस म्हणत राणे यांनी राऊतांची खिल्ली उडवली होती.

नारायण राणेंना अटक राजकीय सुडबुद्धीतूनच होती. आता अनिल परबांना ईडीची नोटीस मिळाली तर लगेच किंकाळ्या सुरू झाल्या हे राजकीय सुडबुद्धीतून आहे. हे आमची सत्यनारायणाची पुजा घालतात आणि आम्ही केलं तर राजकीय सुडबुद्धी, अशी टीकाही त्यांनी केली.

Team Global News Marathi: