संजय राऊत-किरीट सोमय्यांमध्ये सुरू होणार कायदेशीर लढाई, काय आहे प्रकरण ?

 

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत यांच्यावर अनेक आरोप केले. तसेच यानंतर संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला.

अशातच आता संजय राऊत यांनी आज एक ट्विट करत किरीट सोमय्यांना यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. “भाजपचे किरीट सोमय्या उर्फ ​​पोपटलाल माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत आणि शिवसेनेच्या नेत्यांवर चिखलफेक करत आहेत. मी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे आणि श्री पोपटलाल यांना लवकरच कायदेशीर नोटीस दिली जाईल”, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

तसेच सत्याचा लवकरच विजय होईल. होऊन जाउ दे! जय महाराष्ट्र!, असेही ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत होते अटकेत गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती.त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला. राऊत यांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर केले होते. मागील सुनावणीमध्ये ईडीने लेखी उत्तर सादर केले होते.

 

यानंतर नोव्हेंबर महिन्यात पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर पुन्हा एकदा सुनावणी झाली. यावेळी संजय राऊत यांना अखेर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला. आज राऊत न्यायालयात हजर – दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयात पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आरोपनिश्चितीची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. तपास यंत्रणेने समन्स रिपोर्ट सादर न केल्यानं आजची सुनावणी तहकूब झाली आहे.

Team Global News Marathi: