“संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची करावी” – प्रवीण दरेकर

 

मुबंई | ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिले नाही, तर राजकीय संन्यास घेईन, असे मोठे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.त्यांच्या या विधानावरून अनेक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली होती. तसेच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे भविष्य उज्ज्वल असून, त्यांना संन्यास घेऊ देणार नाही, असे म्हटले होते.

यावर, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची करावी, असा टोला भारतीय जनता पक्षाकडून लागण्यात आला आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी. अलीकडच्या काळात संजय राऊत शिवसेनेची चिंता करण्यापेक्षा राष्ट्रवादीची चिंता जास्त करताना दिसत आहेत. यामुळे शिवसेनेत नाराजी आणि अस्वस्थता आहे. शिवसेनेची चिंता केली, तर शिवसैनिक त्यांना धन्यवाद देतील, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत

देवेंद्र फडणवीस लढवय्ये नेते आहेत. त्यांना संन्यास घेऊ देणार नाही. त्यांची महाराष्ट्र, देशाला गरज आहे. अशी भाषा त्यांना शोभत नाही. चांगल्या नेतृत्त्वाचा राजकारणात तुटवडा आहे. देवेंद्र फडणवीसांसारख्या हरहुन्नरी नेत्यांने फकीर होण्याची भाषा करणे योग्य नाही. संन्यास वगैरे घेण्याची भाषा करू नका, त्यासाठी मी त्यांना स्वत: भेटून सांगेन, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर, आता भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

Team Global News Marathi: