प्रत्येक दलित कुटुंबाला १० लाख रुपये मिळणार; तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय |

 

राज्यातील दलित कुटुंबियांच्या सर्वांगीण विकासासाठी तेलंगणा सरकार राज्यातील प्रत्येक दलित व्यक्तीच्या खात्यात १० लाख रुपये जमा करण्याचा निर्णय घाटेअलेला आहे. सुरुवातीला राज्यातील १०० दलित कुटुंबाच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम सरकारद्वारे थेट कुटुंब प्रमुखाच्या खात्यात जमा होईल.

दलितांच्या विकासासाठी मुख्यमंत्री दलित सशक्तीकरण योजनेच्या पहिल्या टप्प्यात १२०० कोटी रुपयांचं बजेट ठेवण्यात आलं असून मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत रविवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री दलित सशक्तीकरण ही योजणा लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनविण्यासाठी आहे.

करिमनगरमधील एका दलित महिलेचा तुरुंगात मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत कॉंग्रेस नेते आणि मधिराचे आमदार मल्लू भट्टी विक्रम यांनी दलितांना आर्थिक मदत देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

या मुद्द्यानंतर राज्य सरकारने या मुद्यावर विचारविनिमय करत दलितांना १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, राज्यभरातून निवडलेल्या ११,९०० कुटुंबांना ही मदत देण्यात येणार आहे.

Team Global News Marathi: