मुंबई | पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकचं खळबळ उडाली होती. नवज्योतसिंग सिध्दू यांनी पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाब सरकारच्या 5 मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता पंजाबमध्ये राजकारण तापलेलं आहे तर दुसरीकडे सिद्धू यांची थेट खासदार संजय राऊत यांच्याशी तुलना करण्यात येत आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी नवज्योतसिगं सिद्धू यांच्यावर देखील टीका केली आहे. संजय राऊत आणि नवज्योतसिगं सिद्धू म्हणजे जुळे भाऊ, हे दोघं जातात तिथं सत्ता जाते, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. या संदर्भत त्यांनी ट्विट करून या दोन्ही नेत्यांवर टीका केली आहे.
एकीकडे नवज्योतसिंग सिध्दू काँग्रेसला संपवत आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत शिवसेनेला बुडवत आहेत, अशा शब्दात नितेश राणे यांनी संजय राऊत आणि नवज्योतसिंग सिध्दू यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यातच बरोबर त्यांनी मुंबई महापलिकेच्या कामावरून देखील मुंबई महापालिकेवर हल्लाबोल केला आहे.