संजय राठोड यांचा राजीनामा अदयाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयात

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना घेरल्यानंतर त्यांनी रविवारी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटून त्यांना सुपूर्त केला होता. मात्र आता या प्रकरणी आणखी एक माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला असला तरीही तो अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडेच असल्याची माहिती समोर आली आहे. राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवलेला नाही.

मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारून ३ दिवस झाले तरीही राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला गेलेला नाही. वनमंत्रिपदाचा अतिरिक्त पदभार कुणाकडे सोपवण्यात आला याबद्दल सरकारने काहीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या संजय राठोड अजूनही वन मंत्रिपदावर कायम आहेत.

त्यात अद्याप राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आला नसल्यानं विरोधक आक्रमक झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधानसभेत यावर काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलं आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधीपक्ष भाजप नेत्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. विविध मुद्दे यावेळी उचलून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले आहेत.

Team Global News Marathi: