अनुराग कश्यप, तापसी पन्नू यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

सोशल मीडियातून आपल्या रोखठोक भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे मारले आहे. या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दाखविले आहे.तसेच त्यांच्या बरोबर विकास बहल आणि मधु मंटेना यांच्या घरीही आयकरने छापे टाकल्याचे वृत्त समोर येत आहे.

आयकर विभागाने बुधवारी दुपारी अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूच्या मालमत्तांवर छापे मारले होते. ‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत अशी माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही छापे मारण्यात आले.कर न भरल्याप्रकरणी तसेच करचुकवल्याच्या आरोपाखाली हे छापे टाकण्यात आले असून, मुंबईतील तब्बल २२ ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे.

यात फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर आयकरने धाडी टाकल्या अशी माहिती समोर येत आहे. ‘फँटम फिल्म’ आणि क्वान या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांवर हे छापे टाकण्यात आले. त्यांनी कर चोरी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे आयकर विभागाने जाहीर केले आहे.

Team Global News Marathi: