संजय राठोड मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार का?

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आल्यानंतर संजय राठोड यांच्या अडचणी अधिक वाढल्या होत्या. तसेच त्यांचे मंत्रीपद सुद्धा धोक्यात आले होते. त्यात मंगळवारी मोहटादेवीच्या दर्शनाला राठोड सहकुटुंब उपस्थित राहिल्यानंतर राठोड यांनी आपल्यावर लावलेले सर्व आरोप नाकारले होते. तसेच पुन्हा आपल्या कामाला सुरवात करणार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले होते.

मागच्या १५ दिवसांपासून गायब असलेले राठोड अचानक काल प्रकट झाले होते. तसेच आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते उपस्थित राहणार की नाही असा प्रश्न आता निर्माण झाला होता. मात्र ते आजच्या मंत्री मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

संजय राठोड यांना पोहरादेवी इथलं शक्तिप्रदर्शन भोवण्याची चिन्हं आहेत. संजय राठोड प्रकरणी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केलीय. राठोड यांनी गर्दी जमवून केलेल्या शक्तिप्रदर्शनावरही शरद पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
राठोड यांच्या प्रकरणामुळे आणि त्यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे महाविकास आघाडीची प्रतिमा मलीन होत असल्याचं चित्र दिसून येतंय. मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी गर्दीप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Team Global News Marathi: