नियम मोडले तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाही – संजय राऊत

नियम मोडला तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाही असे वक्तव्य शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. मंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांनी पोहरादेवी गडावर मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या नियमांना केराची टोपली दाखवून अलोट गर्दी केली होती. यावरून विरोधकांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. .

 

तसेच पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमली होती. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. मात्र राठोड यांच्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

संजय राऊत आज (बुधवारी) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या समर्थनासाठी झालेल्या गर्दीविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असे सांगितले.

Team Global News Marathi: