संजय मंडलिकांनी घेतलेला निर्णय दुख:द पण……….

 

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी केलेल्या बंडखोरीमुळे जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. 2019 मध्ये स्वतःची रसद पुरवून संजय मंडलिक यांना विजयी गुलाल लावलेल्या आमदार सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांच्या बंडखोरीवर नाराजी व्यक्त केली आहे. संजय मंडलिक यांच्या बंडखोरीनंतर सतेज पाटील यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केले.

या दरम्यान ते बोलताना म्हणाले की, संजय मंडलिक दिल्लीला जाताना भेटून गेले त्यावेळी आम्ही त्यांना जाऊ नका अशी विनंती केली होती. मात्र, ते जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमच्या सोबत राहतील अशी आशा आहे. संजय मंडलिक यांनी हा घेतलेला निर्णय दुख:द असल्याचे ते म्हणाले. सहकारामधील प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही एकत्र आलो होतो असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

दरम्यान त्यांनी शिवसेनेमधील बंडखोरीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, 40 आमदार आणि 12 खासदारांना घेऊन काय मिळणार? हा प्रश्न आहेच. त्यामुळे यामागे काय कारणे आहेत हे येत्या दोन महिन्यात बाहेर येतील. देशांमध्ये आजवर असं कधी सुडाचे राजकारण झालं होत नव्हतं असेही ते यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी विरोधी पक्षांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, काँग्रेसने भारत जोडो अभियान सुरू केल्यानंतर लगेच कारवाई करण्यात आली. अशा दबावाला काँग्रेस कधीच बळी पडणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

Team Global News Marathi: