४ महिला आमदारांच्या फसवणूक प्रकरणी एमपीएससी करणाऱ्या जोडप्याला अटक

 

राज्यातील 4 महिला आमदारांची फसवणूक झाल्याची घटना पुण्यात उघडकीस आली होती. प्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी आता ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील भाजप आमदार माधुरी मिसाळ, आमदार श्वेता महाले, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

काय आहे प्रकरण? याप्रकरणी आधी महिला आमदारांनी सायबरला तक्रार दिली होती, मात्र त्यानंतर पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग केला. त्यानंतर पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर आरोपीने आमदार माधुरी मिसाळ यांना फोन करून मुकेश राठोड असं नाव सांगत त्याची आई बाणेर येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचं सांगितलं.

तसंच तिच्या औषध उपचाराकरिता पैशाची गरज आहे, असे सांगून ३ हजार ४०० रुपये गुगल पे नंबर देऊन त्यावर पाठवण्यास सांगितले होते. माधुरी मिसाळ या मुंबई येथे कामानिमित्त गेल्या होत्या. यावेळी आमदार देवयानी फरांदे, मेघनाताई साकोरे, मेघना बोर्डीकर, श्वेताताई महाले यांनी त्यांनासुद्धा आरोपी मुकेश राठोड याने फोन करून अशाच प्रकारचे कारण सांगून पैशाची मागणी केली असल्याचे समोर आले.

Team Global News Marathi: