“सांगलीच्या पालकमंत्र्यांना सत्तेचा माज आणि मस्ती आलीय”

 

सांगली | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक सतत महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका करताना दिसून आले आहेत. त्यातच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पडळकर आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये शाब्दिक युद्ध पेटलेले दिसून येणार आहे.

सांगली जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्यात किती पैसे खर्च झाले याची अद्याप ही माहिती दिली गेली नाही. तसेच बैठकीत एका आमदाराला एक, एका आमदाराला एक न्याय का असे विचारले असता. तर आम्ही बघतो पाहतो असे उत्तर पालकमंत्री देतात. खरं तर पालकमंत्री जयंत पाटील यांना सत्तेचा माज आणि मस्ती असल्याने ते नीट उत्तर देत नाहीत, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ते सांगली मध्ये जिल्हाधिकारी कार्यलय येथे बैठकी नंतर बोलत होते.

शुक्रवारी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यलयात जिल्हा नियोजन बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार आमदार शासकीय अधिकारी उपस्थित होते. महाआघाडीच्या नेत्यांना, आमदारांना विकास कामांसाठी जास्त पैसे दिले जात आहेत. मात्र, आम्हाला कमी दिले जातात, असं गोपीचंद पडळकर कडाडले. निधी देण्यात भेदभाव होत असल्याचा आरोप करत बैठकीतून पडळकर बाहेर निघून आले. पालकमंत्री आणि या मिटिंगचा गोपीचंद पडळकर यांनी निषेध केला आहे. जयंत पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी सर्वाना समान न्याय द्यायला हवा होता, असं पडळकर म्हणाले.

 

Team Global News Marathi: