सांगलीतील पूरग्रस्तांपेक्षा लवकरच मदत देण्यात आलीय, संजय राऊतांच्या टोला !

 

मुंबई | राज्यातील पूरग्रस्तांना मदत मिळाली नसल्याचा दावा करणाऱ्या विरोधकांवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मागच्यावेळी सांगलीत पूर आला होता. त्याच्यापेक्षा पूरग्रस्तांना आता लवकर मदत मिळाली आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हा टोला लगावला. आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. नैसर्गिक संकट असलं तरी सरकार कुठेही कमी पडलेलं नाही. नियंत्रण ठेवणं सरकारचं काम आहे. ते काम सरकार करत आहे. पूरग्रस्ताना मदत उशिरा पोहचली असा आरोप केला जातोय. उशिरा म्हणजे काय? लवकर म्हणजे काय? हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही. सांगलीपेक्षा लवकरच मदत देण्यात आली आहे, असं राऊत म्हणाले.

राज्यात ढगफुटी झाली. मुख्यमंत्री मंत्रालयात होते. नियंत्रण कक्षात बसून सगळ्या गोष्टींवर त्यांचे लक्ष होते. या घटनेमुळे मुख्यमंत्री दु:खी होते. केंद्राच्या संपर्कात राहून त्यांना माहिती देत होते. मागच्या वर्षीपेक्षा जलदगतीने काम करत होते. पूरग्रस्तांना मदत मिळते की नाही यावर मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे, असंही त्यांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: