पडळकरांना दणका | सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आदेश

 

सांगली | नियम तोडून बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्यात आली होती. आता आयोजकांवर कारवाईचे आदेश सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. माझं जिल्हा पोलिस अधिक्षकांशी बोलणं झालं असून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

न्यायालयाची बंदी असताना आज सकाळी पहाटे साडे वाजण्याच्या सुमारास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी एका मैदानावर बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं. कायद्याने बंदी असल्याने कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा पोलिस प्रशासनाने घेतला होता. मात्र कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत पार पडणारच, असा निर्धारच पडळकरांनी केला होता. त्यानुसार पडळकर आणि त्यांचे समर्थक कामाला लागले व नियम धाब्यावर बसवून त्यांनी कार्यक्रम केला होता.

यावर बोलताना जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले की, “बैलगाडा शर्यतीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनामार्फत जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात शर्यतीचं आयोजन होणार होतं, ते झालेलं नाही, परंतु आमच्याकडे काही रिपोर्ट्स आलेत, त्यानुसार चार-पाच बैलगाड्यांनी शर्यतीत भाग घेतला. या संबंधी सांगलीच्या पोलीस अधिक्षकांशी माझं बोलणं झालेलं आहे. याची संपूर्ण सखोल चौकशी करुन याविषयी संबंधितांवर कायदेशी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत”, अशी प्रतिक्रिया सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

 

 

 

Team Global News Marathi: