स्वत:ला मूल होत नसल्यानं मित्राच्या मुलाचा दिला बळी

 

कोल्हापूर | अंधश्रद्धेला कदापि थारा न देणारे आणि त्यांचा कडाडून विरोध करणारे छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी घटना गाडली असून या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. स्वत:ला मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचे अपहरण करून त्याचा बळी देण्यात आल्याची संतापजनक घटना सोनाळी येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र हालहाल व्यक्त केली जात आहे.

समोर आलेय माहितीनुसार वरद रवींद्र पाटील असे बळी देण्यात आलेल्या सात वर्षाच्या बालकाचे नाव असून दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. याबाबतची तक्रार त्याचे वडील रवींद्र गणपती पाटील यांनी मुरगूड पोलिसात दिली. परंतू पोलिसांना वरदचा शोध घेण्यात अपयश आले, त्याचा मृतदेह सोनाळी (ता.कागल) येथील डोंगरात मिळून आल्याने पंचक्रोशीतील नागरिक व महिलांतून प्रचंड संताप व्यक्त झाला. त्यांनी पोलिसांना घेराव घालून जाब विचारला.

वरद हा आपले आजोळ सावर्डे बुद्रुक येथे आजोबा दत्तात्रय शंकर म्हातुगडे यांच्या घरांच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी आई-वडिलांसोबत गेला होता. मंगळवार रात्री साडे आठच्या सुमारास तो बेपत्ता झाला. रात्रभर व दुसऱ्या दिवशी सर्वत्र शोध घेवूनही त्याचा शोध लागला नाही. भरवस्तीत असणाऱ्या गल्लीतून वरद गायब कसा झाला याबाबत तर्क वितर्क वर्तवले जात होते. या गल्लीत नेहमी नागरिकांची वर्दळ असते, अशा ठिकाणाहून तो गायब झाल्याने त्याचवेळी हे कृत्य कुण्या माहितीतील व्यक्तीचे असण्याची शक्यता व्यक्त झाली होती. तोच अंदाज खरा ठरला.

Team Global News Marathi: