हसन मुश्रीफांचा मुलगा, जावई, इतर ७ जणांविरूद्ध करणार एफआयआर – किरीट सोमय्या

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थान झाल्यापासून भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनेक मंत्र्यांवर घोटाळ्याचा आरोप लगावले होते अशातच काही दिवसांपूर्वी त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सुद्धा घोटाळ्याचा आरोप केला होत अशातच आता त्यांनी पुन्हा एकदा मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली आहे. सोमय्यांनी ट्विट करत मुश्रीफ परिवार घोटाळ्याबाबत आणखी एक मोठा आरोप केला आहे .

गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांवर आरोप-प्रत्यारोपही होताना दिस आहे, अशात भाजपचे किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे गंभीर आरोप केलेत. दरम्यान सोमय्यांनी ट्विट करत हसन मुश्रीफ परिवारावर १५८ कोटींचा घोटाळयाचा आरोप करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

ट्विटमध्ये सोमय्या म्हणतात की, हसन मुश्रीफ परिवार १५८ कोटींचा घोटाळा..हसन मुश्रीफ यांचा मुलगा, जावई आणि इतर ७ जणांविरुद्ध पोलिस एफआयआर FIR नोंदवण्यात येणार आहे, पोलीस चौकशी व कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. ED आणि आयकर विभागाने याप्रकरणी कठोर कारवाई करावी यासाठी मी पाठपुरावा करत आहे. असं लिहलं आहे त्यामुळे नवाब मलिक यांच्या पाठोपाठ आता मुश्रीफ यांचा नंबर लागणार का? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.

Team Global News Marathi: