समीर वानखेडेंनी माझ्या मुलीचा सीडीआर मागितला, माझी मुलगी गुन्हेगार आहे काय?

 

सध्या राज्यात मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यात सुरु असलेल्या ट्विटर वॉरवर रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. त्यात आज पुनःई पत्रकार परिषेद घेऊन मलिक यांनी समीर वानखडे यांचयव्हर गंभीर स्वरूपाचे आरोप लगावले आहे. समीर वानखेडे यांनी माझ्या मुलीचा सीडीआर पोलिसांकडे मागितला. सीडीआर हा गुन्हेगारांचा मागवला जातो. सीडीआर मागवायला माझी मुलगी गुन्हेगार आहे काय?, असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

मलिक पुढे म्हणाले की, आम्ही कुणाच्याही खाजगी आयुष्याच्या अधिकाराचा भंग केला नाही. एखादा व्यक्ती धर्मांतर करून दुहेरी लाभ घेत असेल तर त्याचा उल्लेख केला पाहिजे. सत्य समोर आणण्यासाठी काही गोष्टी बाहेर येत आहेत. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर आम्ही घाला घालत नाही. माझ्या जावयाला बंद केलं गेलं.

तर दुसरीकडे हे कोर्टात प्रकरण आहे. माझी मुलगी अनेक कागदपत्रं काढण्याचा प्रयत्न करत आहे. समीर वानखेडेंनी मुंबई पोलिसांना पत्रं लिहून माझ्या मुलीचा सीडीआर मागितला. माझी मुलगी निलोफर मलिक काय गुन्हेगार आहे का? कोणत्या आधारावर माझ्या मुलीच्या खाजगी आयुष्याची माहिती मागितली आहे.? असा सवाल करतानाच वानखेडे आपल्या मर्यादेचा भंग करत आहेत, असं मलिक म्हणाले.

 

Team Global News Marathi: