समीर वानखेडेऐवजी दुसरा अधिकारी करणार आर्यन खान प्रकरणाचा तपास?

 

मुंबई | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखडे यांच्यावर गंभीर आरोप लगावून एकच खळबळ उडवून दिली होती. मलिक रोज नवीन नवीन खुलासा करून वानखडे यांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच आता या होत असलेल्या आरोपांवरून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास एका नवीन अधिकाऱ्याकडे सोपवू शकते.

समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास करत असलेल्या समीर वानखेडे यांच्याविरुद्ध दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. एनसीबीच्या सूत्रांनी एका न्यूज चॅनेलला सांगितले की,’आर्यन खान प्रकरणातील तपास अधिकारी वानखेडेचा मुद्दा सोमवारी एजन्सीच्या उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. वानखेडे यांच्याविरुद्ध दक्षता चौकशीचे आदेश दिलेले असल्याने त्यांनी तपास सुरू ठेवणे योग्य नाही, असे अधिकाऱ्यांचे मत होते. बुधवारी एन्सीबाचे उच्च पदस्थ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या मुंबई भेटीनंतर एजन्सी अंतिम निर्णय घेईल परंतु उच्च अधिकारी बदलांवर विचार करत आहेत.’

क्रूझ शिप अंमली पदार्थ प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व करणारे मुंबई प्रादेशिक युनिटचे प्रमुख समीर वानखेडे सोमवारी रात्री राष्ट्रीय राजधानीत पोहोचले. क्रूझ शिप अंमली पदार्थ प्रकरणात वानखेडे यांच्यासह एजन्सीच्या काही अधिकाऱ्यांनी आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप एका साक्षीदाराने केला होता. त्यासाठीच्या NCB च्या दक्षता तपासाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर वानखेडे दिल्लीत आले होते.

Team Global News Marathi: