समीर वानखेडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, त्यांना पण…. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचे परखड मत

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक अयनच्या पाठोपाठ आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. समीर वानखेडे हे काही कायद्यापेक्षा मोठे नाहीत अशी टीका अरविंद सावंत यांनी केला आहे. २० ग्रॅम ड्रग्ज प्रकरण २४ तास दाखवलं जातं पण गुजरातमध्ये हेरॉईन पकडण्यात आलं. मात्र त्याच्यावर कारवाई झाली नाही. हा दुजाभाव का? असा सवालही अरविंद सावंत यांनी उपस्थित केला आहे.

अरविंद सावंत मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. 20 ग्रॅम 22 ग्रॅम ड्रग्जचे प्रकरण 24 तास दाखवले जात आहे. गुजरातमध्ये हेरॉईन पकडण्यात आलं मात्र त्यांच्यावर कारवाई नाही. हा दुजाभाव नाही का? तुमची न्यायिक भूमिका नाही, यात दुजाभाव दिसतो, अशी टीका सावंत यांनी केली आहे.

पुढे बोलताना सावंत म्हणाले की, खुलासे कशासाठी करता? तुम्ही निस्पृह आहात ना त्यामुळे खुलासे करण्याची गरज नाही. केंद्र सरकारने जनाची मनाची सर्वच सोडून दिली आहे. मुंबईमध्ये एवढ्या कारवाया झाल्या पण त्याच्या बातम्या आल्या नाहीत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना तर कारवाईसाठी गुजरातमध्ये पाठवले पाहिजे, अशी घणाघाती टीकाही सावंत यांनी केली आहे.

Team Global News Marathi: