नवाब मलिकांचे आता ‘स्पेशल २६’ नवाब मलिक नवा करणार गौप्यस्फोट?

 

आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. त्यातच एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने समीर वानखडे यांच्यावर जो आरोप केला आहे त्याची चौकशी केली जाणार असून एनसीबीच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक मुंबईत त्यासाठी दाखल होत आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

आता त्या पाठोपाठ मंत्री नवाब मलिक यांनी समर वानखडे प्रकरणात आणखी एक खळबळजनक खुलासा करणार आहेत. नवाब मलिक यांनी आज सकाळी एक ट्विट करीत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. लवकरच मी ‘स्पेशल २६’ उघड करणार आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे. त्यामुळे हे स्पेशल २६ काय आहे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मलिक यांनी वानखेडे यांचा जन्म दाखला ट्विट केला. त्यात वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत, असे मलिक यांनी म्हटले होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वानखेडे यांनी नक्की कोणते जन्म प्रमाणपत्र सादर केले आहे, त्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन फसवणूक केली आहे का, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.

 

Team Global News Marathi: